‘रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस’ या संस्थेचा अहवाल !

पुणे – उन्हाळ्यामध्ये देशातील देहली, पुणे, पाटणा, चंडीगड आणि लखनऊ या शहरांतील हवेच्या प्रदूषणाची पातळी धोक्याच्या स्थितीत आहे. या शहरांतील सूक्ष्म धूलिकणांची (पी.एम्. १०) पातळी अधिक असून, राष्ट्रीय गुणांकन पातळी ओलांडली आहे. मुंबई, भाग्यनगर आणि कोलकाता या शहरांची हवा उन्हाळ्यामध्ये अल्प प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहरांतील ‘रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस’ या संस्थेने हा अहवाल सिद्ध केला आहे. यात देशातील मुंबई, देहली, पुणे, कर्णावती (अहमदाबाद), पाटणा, चंदीगड, लखनौ, कोलकाता, भाग्यनगर, बेंगळुरू आणि चेन्नई अशा ११ शहरांमध्ये ही पडताळणी करण्यात आली. हवेच्या प्रदूषणाची पातळी ही ६० मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकी हवी आहे. बहुतांश शहरांची ही पातळी दुप्पटीने वाढली असल्याचे दिसून येत आहे.