फर्ग्युसनच्या आवारातील वसतीगृहामध्ये विद्यार्थी मृतावस्थेत !

फर्ग्युसन महाविद्यालय

पुणे – विधी (कायद्याचा) अभ्यासक्रम शिकणार्‍या भूषण ढुमणे या महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह वसतीगृहामध्ये आढळून आला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी ‘अकस्मात् मृत्यू’, अशी नोंद केली आहे. भूषण हा ‘फर्ग्युसन महाविद्यालया’च्या आवारातील ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालया’त शिक्षण घेत होता. २ मे या दिवशी तो बेशुद्धावस्थेत पडल्याचे लक्षात आले. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.