राज्यातील प्रत्येकच ठिकाणचे पोलीस दल अशा प्रकारे सक्षम आणि तत्पर निर्माण व्हायला हवे !
पालघर – राज्यभरातील पोलीस विभागांमध्ये केलेल्या मूल्यमापनात पालघर पोलीस दलाला १०० पैकी ९०.२९ गुण प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आले आहे. या अगोदरही ५० दिवसांच्या कार्यालयीन गुणांकनामध्ये जिल्हा पोलीस प्रथम क्रमांकावर होते.
१. पालघर जिल्हा पोलीस दलाने जिल्हा पोलिसांचे संकेतस्थळ अद्ययावत् करून ते सोपे आणि सर्वांना समजेल असे केले होते.
२. ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ‘चॅट बॉक्स प्रणाली’सह स्वच्छता मोहीम, तक्रारीचे तात्काळ निवारण, ई ऑफिस प्रणाली, व्यवस्थापन प्रणाली, कार्यालयीन कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, गस्तीसाठी ‘थर्ड ॲप्लिकेशन, तसेच सीसीटीव्ही निगराणी अशा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. याच आधारे त्यांना चांगले गुणांकन मिळून पालघर जिल्हा अव्वल स्थानी आला आहे.