International University Campuses in Navi Mumbai : नवी मुंबईत २ आंतरराष्ट्रीय विद्यापिठांचे ‘कॅम्पस’ स्थापन होणार !

  • ‘वेव्हज २०२५’ परिषदेतील महत्त्वपूर्ण करार !

  • नवी मुंबई उदयोन्मुख शैक्षणिक केंद्र होणार !

मुंबई – दोन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे म्हणजे ‘द युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ (यूके) आणि ‘द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’ (यु.डब्ल्यु.ए.) यांनी नवी मुंबई एज्युसिटीमध्ये ‘कॅम्पस’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केले आहेत. हा स्वाक्षरी समारंभ २ मे या दिवशी ‘वेव्हज २०२५’ परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.

प्रतिकात्मक चित्र

हा उपक्रम शैक्षणिक संधी वाढवण्यास आणि परिसराच्या विकासाला गती देण्यास साहाय्य करेल. याद्वारे उदयोन्मुख शैक्षणिक केंद्र म्हणून नवी मुंबईचे स्थान अधिक भक्कम करील.