हिंदु समाजाला विविध सुविधा मिळणार

मुंबई – राज्यशासनाचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘कॉल हिंदू जॉब्स’ या डिजिटल ॲपचे उद्घाटन केले आहे. ‘कॉल हिंदू जॉब्स’ हे एक ॲप असून ते हिंदु समाजाला एकाच ठिकाणी रोजगार, ई-कॉमर्स, धार्मिक पर्यटन, ऑनलाइन विवाह आणि सांस्कृतिक जागरूकता यांसारख्या सुविधा प्रदान करील. हे ॲप लवकरच चालू होणार आहे. यासाठी हिंदू जागरण मंचशी संबंधित युवा कार्यकर्ते विशाल दुराफे यांनी पुढाकार घेतला आहे.
हिंदु तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, समाजाला आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मंत्री लोढा यांनी या उपक्रमाचे वर्णन ‘तंत्रज्ञानाच्या युगाची आवश्यकता’ म्हणून केले आहे. ‘समाजाची एकता आणि स्वावलंबन वाढवण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे’, असेही ते म्हणाले.