भोपाळ लव्ह जिहाद प्रकरण
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मुख्य आरोपी फरहान याच्या समवेत झालेल्या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात तो घायाळ झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. फरहान जिहादच्या उद्देशाने हिंदु मुलींवर बलात्कार करायचा. हिंदु मुलींवर बलात्कार करण्यासाठी त्याने एक टोळी बनवली होती. तो महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनींशी मैत्री करायचा. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमीष दाखवून त्यांच्यावर बलात्कार करत होता.
पोलिसांनी फरहान याला अटक केली होती. तो पोलिसांच्या कह्यातून पळून जात असतांना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाला.