Pakistan Sympathizers In UP : रस्तावर चिकटवलेला पाकचा झेंडा काढण्याचा प्रयत्न करणार्‍या विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढले !

सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना

रस्तावर चिकटवलेला पाकचा झेंडा काढण्याचा प्रयत्न करणारी विद्यार्थीनी

सहारणपूर (उत्तरप्रदेश) – पहलगाम येथील आक्रमणानंतर देशभरातील जनतेकडून पाकचा निषेध करण्यासाठी त्याच्या राष्ट्रध्वज रस्त्यावर चिकटवण्यात येत आहे. त्याद्वारे त्याचा अवमान केला जात आहे. येथील गंगोह भागात अशा प्रकारचे रस्त्यावर चिकटवण्यात आलेला पाकचा राष्ट्रध्वज एका विद्यार्थिनीने काढण्याचा प्रयत्न केल्याने तिला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

विद्यार्थिनीकडून झेंडा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक संघटनांनी विद्यार्थिनीचे वर्तन देशविरोधी असल्याचे म्हटले. याबरोबरच काही जणांनी महाविद्यालयात जाऊन तिला शाळेतून काढून टाकण्याची मागणी केली. यानंतर महाविद्यालय प्रशासनाने वाद वाढू नये; म्हणून या विद्यार्थीनीला महाविद्यालयातून काढून टाकले.

संपादकीय भूमिका

भारतात पाकप्रेमींची कमतरता नाही, हेच अशा घटनांतून दिसून येते !