
वृंदावन (उत्तरप्रदेश) – येथील एका आश्रमात एका मुसलमान कुटुंबातील ८ सदस्यांनी वैदिक मंत्रोच्चारात हिंदु धर्म स्वीकारला. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्याचा हा निर्णय स्वेच्छेने घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या कुटुंबातील प्रमुख झाकीर (वय ५० वर्षे) यांनी हिंदु धर्म स्वीकारल्यावर स्वत:चे नाव जगदीश ठेवले आहे. जगदीश यांनी नंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, त्यांचे पूर्वज मोगलांच्या काळापर्यंत हिंदु होते. यानंतर त्यांच्या पूर्वजांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. ‘कोणाच्याही दबावाखाली न येता स्वेच्छेने आपण हिंदु धर्म स्वीकारत आहोत’, असे त्यांनी या वेळी सांगितले.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार जगदीश यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुले, सुना आणि नातवंडे यांचा समावेश आहे. या सर्वांनी विधीवत् हिंदु धर्माचा स्वीकार केला आहे.