पुणे – शहरातील ४१ खासगी शिक्षणसंस्थांच्या १४७ मिळकती आहेत. त्यांची एकूण ३६९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये सिंहगड संस्थेची ३५८ कोटी रुपये थकबाकी आहे. ७८ कोटी ३३ लाख रुपये मूळ कराची रक्कम असून २८० कोटी ६६ लाख रुपये दंडाची रक्कम आहे. अन्य ४० शिक्षणसंस्थांची ८३ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला असल्याचे समोर आले आहे. (प्रतिवर्ष मिळकतकर वसुलीसाठी सक्तीची उपाययोजना केली असती, तर एवढी थकबाकी राहिली नसती ! केवळ नोटीस पाठवून काही उपयोग होणार नाही. त्यांना मालमत्ताकर भरण्याची सवय लावली पाहिजे ! – संपादक)
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांवर महापालिका भवनामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’च्या थकबाकी विषयावर चर्चा करण्यात आली. या संस्थेने मालमत्ताकरच नाही, तर कर्मचार्यांचे वेतनही थकवले आहे. त्यामुळे महापालिकेने या संस्थांचा लिलाव करून कर्मचार्यांचेही वेतन द्यावे, अशी मागणी या वेळी मनसेचे नेते हेमंत संभूस यांनी केली.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या शिक्षणसंस्थांवर कारवाई करत संस्थांच्या मालमत्ता कह्यात घेऊन लिलाव करावा, असेच सामान्य नागरिकांना वाटते ! |