काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांना देहली न्यायालयाची ‘क्लीन चिट’ !

वर्ष २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण

काँग्रेसचे सुरेश कलमाडी

पुणे – काँग्रेसचे मोठे नेते आणि वर्ष २०१० मधील राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी यांच्यावर वर्ष २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनात भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर सध्याच्या प्रकरणासह गुन्हे आणि ‘मनी लाँड्रिंग’ची (अवैध प्रकारे मिळवलेला पैसा विविध ठिकाणी गुंतवून लपवण्याचा प्रयत्न करणे) प्रकरणे प्रविष्ट होती. २ महत्त्वाच्या करारांचे वाटप आणि कार्यवाहीत कलमाडी अन् इतरांवर अपव्यवहाराचा आरोप झाला. त्यांना देहली न्यायालयाने ‘क्लीन चिट’ दिली आहे. कलमाडी, तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत आणि इतर यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाचा ‘क्लोजर रिपोर्ट’ देहली न्यायालयाने स्वीकारला आहे.