१ सहस्र २०० किलो गोमांस जप्त !

दौंडमध्ये ६ धर्मांधांसह अन्य एकावर गुन्हा नोंद

प्रतिकात्मक चित्र

दौंड (जिल्हा पुणे) – येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ सहस्र २०० किलो गोमांस जप्त करून एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. भीमा नदीकाठावर असलेल्या ईदगाह मैदानाजवळ २९ एप्रिल या दिवशी ही कारवाई केली आहे. माहिती मिळताच उपनिरीक्षक संतोष कुलथे यांच्यासमवेत दौंड पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आले आहे. तेथे आसिफ कुरेशी, शाहरूख कुरेशी, अकिल कुरेशी, वाहिद बाबू खान, आलम शेख, नितीन गायकवाड आणि आजीम कुरेशी हे ७ जण गायींची कत्तल करून गोमांस गोळा करत असतांना आढळले. पोलिसांनी आसिफ कुरेशी, शाहरूख कुरेशी, अकिल कुरेशी आणि वाहिद खान यांना कह्यात घेतले; मात्र पोलिसांना पाहून आलम शेख, नितीन गायकवाड, आजीम कुरेशी हे पळाले. दौंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अहिरेश्वर जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका :

सरकारने आता तरी गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करावी !