पुणे – जातीवाचक शिवीगाळ केली, प्रेमसंबंधातून वेळोवेळी बलात्कार केला. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर विवाह नाकारला. गर्भपात करण्यास भाग पाडले, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विराज गावडे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. २८ वर्षीय पीडित तरुणीने तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपी विराज पुण्यात स्पर्धा परीक्षेची सिद्धता करत होता. वर्ष २०२० मध्ये त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाह केल्याची गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. पीडितेला पत्नीप्रमाणे दर्जा, वागणूक दिली नाही. वेळोवेळी पीडितेकडे पैशांची मागणी करत १० ते १२ लाख रुपये उकळले.
आरोपी विराज याची उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर पीडितेने ‘कुटुंबियांशी ओळख करून दे, विवाहाची माहिती दे’ अशी विनंती केली. तेव्हा आरोपीने ‘तू खालच्या जातीची आहे. आपला विवाह मान्य करणार नाहीत. माझा विचार सोडून दे’, असे सांगून भेटण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणात त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणाल यांनी त्याला साथ दिली. ‘मला वडिलांच्या जागेवर चंद्रपूर येथे नोकरी मिळणार होती. विराजच्या सल्ल्यामुळे मी ती नोकरी नाकारली. आज मला नोकरीही नाही, विराजने माझी फसवणूक केली’, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकापोलीस अधिकारीच अत्याचार करत असतील, तर सामान्य जनता न्यायाची अपेक्षा कशी करील ? फसवणूक करणार्या पोलीस अधिकार्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! |