पुणे – भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवून अन् भ्रमणभाषवर संपर्क साधून त्रास देणार्या अमोल काळे या तरुणाला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मुंडे यांना त्रास देत होता. (राज्यात महिला मंत्रीही सुरक्षित नसणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
या प्रकरणी मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या साहाय्याने त्याला कह्यात घेतले.
ते म्हणाले की, आरोपी विद्यार्थी आहे. त्याच्या त्रासदायक वर्तनामागील हेतू पडताळला जात आहे. तो परळी (जिल्हा बीड) येथील रहिवासी आहे.