१२ घंट्यांनंतर आरोपी सापडला !
नाशिक – प्राणघातक आक्रमणप्रकरणी भ्रदकाली पोलिसांनी क्रिश शिंदे या आरोपीला अटक केली होती. त्याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यासाठी त्याला पोलीस ठाण्यात आणत असताना त्याने पोलिसांच्या हाताला हिसका देत पलायन केले.
त्याचा मित्र दुचाकी घेऊन आला होता. त्याच्यावर उडी मारून बसत आरोपी पळून गेला. सीसीटीव्हीमध्ये हे दृश्य चित्रीत झाले होते. आरोपीने पलायन केल्यावर त्याच्या मागे पोलीस धावत जात असल्याचे त्यात दिसत आहे. त्यातील एकजण खाली पडतो, तर एक पोलीस मागून दुचाकी नेतांना दिसतो. क्रिश शिंदे हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. १२ घंटे पाठलाग केल्यावर पोलिसांनी त्याला कसारा घाटातील जंगलात शोधून काढून कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकापोलिसांच्या तावडीतून आरोपी पळून जाणे हे पोलीस यंत्रणेसाठी लज्जास्पद ! पळणार्या आरोपीला न पकडू शकणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे पकडणार ? |