U.S. VP JD Vance : लादेनला ठार मारण्यापेक्षाही मोठी कारवाई करावी !

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचे भारताला पाठिंबा देत आवाहन 

(डावीकडे) अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट युद्ध होऊ नये. अमेरिकेसह अनेक देशांची हीच भूमिका आहे. आतंकवादाविरोधात पाकिस्तानने भारताला साहाय्य केले पाहिजे, तसेच पाकिस्तानात लपलेल्या आतंकवाद्यांचा शोध घेऊन त्यांना भारताने नष्ट केले पाहिजे.

ही कारवाई पाकिस्तानसाठी ओसामा बिन लादेन याला ठार मारल्यापेक्षाही भयंकर असायला हवी, अशा शब्दांत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी भारताला पाकविरोधात कारवाई करण्यासाठी समर्थन दिले आहे. (अमेरिकेनेही आता भारताला अशा प्रकारचे समर्थन दिल्याने भारताने पाकचा नायनाटच करणे आवश्यक आहे. आता भारताकडे हे नाकारण्याचे कोणतेही कारण राहिलेले नाही, असेच राष्ट्राभिमानी नागरिकांना वाटेल ! – संपादक)