
१. आनर्ताेऽहिच्छत्रः पाटलिपुत्रो द्युतिर्दितिः श्रीशः ।
क्षौरे स्मरणादेषां दोषा नश्यन्ति निःशेषाः ।।
अर्थ : आनर्त (सौराष्ट्रदेश), अहिच्छत्र (मथुरा किंवा नृसिंह मानतात), पाटलीपुत्र, द्युति, दिती (कश्यप ऋषींची पत्नी जिला देवमाता म्हणून ओळखतात), श्रीश (विष्णु) यांच्या स्मरणाने निषिद्धदिनी केलेले क्षौरविधीचे दोष नष्ट होतात, यात तीळमात्र संशय नाही.
टीप : क्षौर म्हणजे शेंडी ठेवून शेष राहिलेले डोक्यावरचे केस कापणे आणि दाढी करणे.
२. केशवं चानर्तपुरं पाटलिपुत्रं पुरीमहिच्छत्रम् ।
दितिमदितिं च स्मरतां क्षौरविधौ भवति कल्याणम् ।।
अर्थ : केशव, आनर्त (सौराष्ट्रदेश), पाटलीपुत्र, अहिच्छत्रपुरी (मथुरा), दिती किंवा अदिती यांच्या (कश्यप ऋषींची पत्नी जिला दैत्यमाता म्हणून ओळखतात तिच्या) स्मरणाने (निषिद्धदिनी केलेल्या) क्षौरकर्मामुळे (दुष्ट तिथी, नक्षत्र, वार इत्यादींचे दोष लागत नाहीत आणि) आपले कल्याण होते.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०१२)