मोगलांवर ८ प्रकरणे, तर हिंदु साम्राज्यांवर केवळ १ प्रकरण

प्रसिद्ध अभिनेते आर्. माधवन् यांनी इतिहासाच्या अभ्यासक्रमावर उपस्थित केले प्रश्न

मुंबई – जेव्हा मी शाळेत इतिहासाचा अभ्यास केला, तेव्हा मोगलांवर ८ प्रकरणे, हडप्पा आणि मोहेंजोदारो संस्कृतीवर २ प्रकरणे, ब्रिटीश राजवट आणि स्वातंत्र्यलढा यांवर ४ प्रकरणे आणि दक्षिणेकडील चोल, पांड्या, पल्लव आणि चेरा या राज्यांवर केवळ १ प्रकरण होते. मला ठाऊक आहे की, जर मी हे बोललो तर भविष्यात मला अडचणी येतील; पण तरीही मी तेच सांगेन, असे विधान प्रसिद्ध अभिनेते आर्. माधवन् यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

चोल साम्राज्याचा इतिहास २ सहस्र ४०० वर्षे जुना 

आर्. माधवन् पुढे म्हणाले की, ब्रिटीश आणि मोगल यांनी आपल्यावर सुमारे ८०० वर्षे राज्य केले; परंतु चोल साम्राज्याचा वारसा २ सहस्र ४०० वर्षे जुना आहे. चोल राजवंश समुद्र प्रवास आणि नौदल शक्तीच्या संदर्भात आघाडीवर होता. त्यांचा व्यापार रोमपर्यंत पसरला आणि त्यांनी त्यांच्या समुद्री ताफ्यातून अंगकोर वाट (कंबोडिया) पर्यंत मंदिरे बांधली. जैन धर्म, बौद्ध आणि हिंदु धर्म चीनमध्ये पसरला. कोरियामध्ये अजूनही तमिळ भाषेचे अनेक शब्द वापरले जातात, जे सूचित करते की, तमिळ संस्कृती तिथे पोचली होती; परंतु इतका महान आणि समृद्ध वारसा आपल्या पुस्तकांमध्ये केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित होता.

आपल्या संस्कृतीत लपलेल्या वैज्ञानिक ज्ञानाची थट्टा केली जाते !

आर्. माधवन् यांनी शेवटी म्हटले की, हा अभ्यासक्रम कुणी ठरवला ? तमिळ जगातील सर्वांत जुनी भाषा आहे; पण त्याविषयी कुणालाही ठाऊक नाही. आपल्या संस्कृतीत लपलेल्या वैज्ञानिक ज्ञानाची अजूनही थट्टा केली जाते.

संपादकीय भूमिका

निवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी हिंदूंचा समृद्ध इतिहास त्यांच्यापासून लपवला गेला. यात आता पालट होत आहे; मात्र निवळ पालट अपेक्षित नाही, तर इतिहासाचे असे विकृतीकरण करून सत्य लपवणार्‍यांवर कारवाई होणे आवश्यक !