
ठाणे, २ मे (वार्ता.) – मागील काही मासांपासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, आसनगाव, ठाणे अशा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान घाईच्या वेळेत प्रवास करणार्या महिलांकडील मौल्यवान वस्तू, पर्स चोरण्यात येत होत्या.
या चोरीप्रकरणी वैशाली सचदेव (वय २७ वर्षे) या महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण लोहमार्ग पोलीस करत आहेत. (कायद्याचे भय वाटत नसल्याचाच हा परिणाम ! – संपादक)