
जैसलमेर (राजस्थान) – राजस्थान गुप्तचर विभागाने पाकिस्तानला माहिती देणार्या पठान खान नावाच्या एका गुप्तहेरास जैसलमेरच्या मोहनगड भागातून पकडले आहे. तो भारतीय सैन्याची गोपनीय माहिती, व्हिडिओ, छायाचित्रे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ला (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सला) पाठवत होता. तो दीर्घ काळापासून आय.एस्.आय.साठी काम करत होता. वर्ष २०१३ मध्ये पठान खान पाकिस्तानात गेला होता. पाकिस्तानात त्याचे अनेक नातेवाईक आहेत. तो पाकिस्तानला गेला असतांना आय.एस्.आय.समवेत त्याचा संपर्क झाल्याची शक्यता अन्वेषण यंत्रणांना आहे.
संपादकीयअशा देशद्रोह्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! |