Love Jihad: Girl Beheaded : उत्तराखंडमध्ये मुसलमान तरुणाकडून हिंदु प्रेयसीची गळा चिरून हत्या !

डोके पिशवीत घालून बुडवले, तर धड कालव्यात फेकले !

लव्ह जिहाद

रुद्रपूर (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील खातिमा परिसरात ‘लव्ह जिहाद’ची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुसलमान समुदायातील एका तरुणाने हिंदु प्रेयसीची गळा चिरून हत्या केली. धर्मांध आरोपीने तिचा शिरच्छेद केला. त्याने तिचे डोके दगडांनी भरलेल्या पिशवीत घालून बुडवले, तर धड कालव्यात फेकून दिले. मृताच्या बहिणीने तिची बहिण बेपत्ता झाल्याची तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. हरियाणा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेह कह्यात घेतला. डोक्याचा शोध चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

१. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पूजा मंडल (३२) ही तिची धाकटी बहीण पुरमिला बिस्वास हिच्यासमवेत गुरुग्राम (हरियाणा) येथील एका ‘स्पा सेंटर’मध्ये काम करत होती. पूजा काही दिवसांपूर्वी सितारगंज (उत्तराखंड) येथे आली आणि त्यानंतर ती घरी परतलीच नाही.

२. पूजाची धाकटी बहीण पुरमिलाने १९ डिसेंबर या दिवशी गुरुग्राममधील सेक्टर ५ पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार प्रविष्ट केली. हरियाणा पोलीस तिचा सतत शोध घेत होते. अखेर पोलिसांनी टॅक्सीचालक मुश्ताक अली याला अटक केली. आरोपी मुश्ताक अली हा सितारगंज येथील रहिवासी आहे. त्याने साडेपाच महिन्यांपूर्वी पूजाचा गळा चिरून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याची स्वीकृती दिली.

३. आरोपी मुश्ताक अलीने सांगितले की, तो पूजाला २०२२ मध्ये रुद्रपूर बस स्थानकावर  भेटला होता. त्यानंतर दोघांमधील ओळख वाढली. दोघांमध्ये प्रेमसंबंध चालू झाले; पण एक दिवस आरोपी मुश्ताकने दुसर्‍याच मुलीशी लग्न केले.

४. यावरून दोघांमध्ये वाद झाला. एक दिवस संधी साधून आरोपी मुश्ताक पूजाला खतिमा येथील नादन्ना कालव्याजवळील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे त्याने पूजाचा गळा चाकूने चिरून तिची हत्या केली.

संपादकीय भूमिका 

अल्पसंख्य म्हणवणारे मुसलमान बहुसंख्य हिंदूंचा पद्धतशीरपणे अंत करत आहेत आणि कुठलेही सरकार हे प्रकार रोखू शकत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !