मराठी राजभाषा चळवळीला संघटनात्मक बळकटी आणणार !

मराठी राजभाषा निर्धार समितीच्या बैठकीत निर्णय

पणजी, १ मे (वार्ता.) – मराठी राजभाषा निर्धार समितीच्या नुकत्याच झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत नियोजित मराठी राजभाषा चळवळीला दूरदृष्टीने संघटनात्मक बळकटी आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत आतापर्यंत अस्तित्वात असलेली राज्य सुकाणू समिती विसर्जित करण्यात येऊन त्याऐवजी केंद्रीय स्तरावर केंद्रीय मार्गदर्शक मंडळ आणि केंद्रीय कार्यकारी मंडळ अशी द्विस्तरीय संघटनात्मक कार्यपद्धतीची सिद्धता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मार्गदर्शक मंडळ

मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली पुढीलप्रमाणे केंद्रीय मार्गदर्शक मंडळ निश्चित करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक – गो.रा. ढवळीकर, ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ आणि गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर; त्याचप्रमाणे ‘साहित्य-संगम’चे प्राचार्य गजानन मांद्रेकर, ‘भारतीय विचार मंच, गोवा’चे प्रा. प्रवीण नेसवणकर, ‘विवेकानंद सेवा ट्रस्ट’चे सूर्यकांत गावस, ‘इंटरनॅशनल सम्राट’चे दिवाकर शिंक्रे, पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, शिक्षणतज्ञ डॉ. गोविंद देव, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा मोघे, शाणूदास सावंत तळावलीकर, उद्योजक विनोद पोकळे आणि ‘लोकहित मंच’चे प्रा. भिवा मळीक

केंद्रीय कार्यकारी मंडळ

वास्तूविशारद मच्छिंद्र च्यारी (फोंडा), संघटक संतोष धारगळकर (म्हापसा), कवयित्री आणि ‘मराठी अस्मिता, सत्तरी’च्या डॉ. अनुजा जोशी; सामाजिक कार्यकर्ते रामदास सावईवेरेकर (पणजी), सामाजिक कार्यकर्त्या प्रा. अनिता तिळवे (फोंडा), साहित्यिक प्रा. नारायण महाले (मुरगाव), प्राचार्य संदीप पाळणी (म्हापसा), ‘श्रीविद्या प्रतिष्ठान’चे नितीन फळदेसाई (मुरगाव), प्रा. परेश पणशीकर (केपे), ‘विद्याभारती-गोवा’च्या अधिवक्त्या रोशन रवींद्र सामंत, सहकार क्षेत्रातील विनय प्रेमानंद नाईक (सांगे), ‘मराठी अस्मिता’चे विजय नाईक (सत्तरी), प्रा. नवसो परब (पेडणे) आणि प्रा. आत्माराम गावकर (डिचोली).

कार्यकारी मंडळावर निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर, मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर, गुरुदास सावळ, प्रदीप घाडी आमोणकर, असे ४ जण पदसिद्ध पद्धतीने असतील. मार्गदर्शक मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांवर यथावकाश नवीन नावे जोडण्यात येणार आहेत. याच पद्धतीने सर्व १८ प्रखंड आणि ग्रामपंचायत स्तरांवरही याच पद्धतीची द्विस्तरीय संघटनात्मक रचना स्थापन करण्यात येईल. मार्गदर्शक मंडळांवर ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकारी मंडळांवर सामान्यतः नव्या दमाचे तरुण कार्यकर्ते रहातील, अशी ही नवी रचना संमत करण्यात आली.