
पुणे – शहरी गरीब योजनेअंतर्गत ‘पूना हॉस्पिटल’मध्ये भरती असलेले रुग्ण महेश पाठक यांचा २५ एप्रिलच्या रात्री १.३० वाजता मृत्यू झाला. या वेळी रुग्णाविषयी दुजाभाव करत मृतदेह ८ घंट्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांच्या कह्यात (ताब्यात) दिला, अशी तक्रार नीलेश महाजन यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे केली होती. महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी ‘पूना हॉस्पिटल’ प्रशासनाला २४ घंट्यांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नीलेश महाजन यांनी २५ एप्रिल या दिवशी तक्रार प्रविष्ट केली होती. महापालिकेने पाठवलेल्या नोटिसीमध्ये रुग्णालयाने कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.