
सांगली, १ मे (वार्ता.) – हिंदु एकता आंदोलन शिवोत्सव समितीच्या वतीने ३० एप्रिल या दिवशी बसवेश्वर जयंती निमित्त भाजपचे सांगली मंडल अध्यक्ष श्री. रवींद्र वादवणे आणि उद्योजक श्री. शंकर माने यांच्या हस्ते बसवेश्वर प्रतिमेला पुष्पहार घालून बसवेश्वर महाराजांना अभिवादन केले. या वेळी हिंदु एकताचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे, कार्यकर्ते सर्वश्री राजू जाधव, प्रसाद रिसवडे, अनिरुद्ध कुंभार, गजानन मोरे आदी उपस्थित होते.