सासवड (पुणे) येथे साकारले छत्रपती शिवरायांचे तालुक्यातील पहिले मंदिर !

छत्रपती शिवाजी महाराज

सासवड(पुणे) – पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या सुपे खुर्द या ऐतिहासिक गावात ‘जय भवानी शिवजयंती उत्सव मंडळा’च्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचे तालुक्यातील पहिले मंदिर साकारले आहे. या मंदिरात ३० एप्रिल या दिवशी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महाराजांच्या सिंहासनावरील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि कार्याचा जागर होण्यासाठी उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त शिवप्रेमींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

३ मे या दिवशी पुरंदर गडाकडे ‘शिवज्योत’ आणण्यासाठी प्रस्थान होणार आहे. सासवड येथील शिवतीर्थ चौकातून सुपे खुर्द गावापर्यंत मूर्ती आणि शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात येणार असून माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन होणार आहे. याच दिवशी शिवव्याख्याते प्रमोद महाराज कारकर आणि श्रद्धा जगताप यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे.