जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या बदल्यात महापालिकेने १३६ कोटी रुपये देण्याची मागणी !

पुणे जिल्हा परिषद

पुणे – समाविष्ट गावातील मिळकत कराची वसुली स्थगित असून पायाभूत सुविधांसाठीही खर्च होत आहे; मात्र या परिस्थितीत पुणे जिल्हा परिषदेने महापालिकेला मालकीच्या इमारतींच्या बदल्यात १३६ कोटी रुपये द्यावेत, अशा मागणीचे पत्र पाठवले आहे. महापालिकेने या संदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. महापालिकेमध्ये समाविष्ट गावातील शाळांच्या इमारती, ग्रामपंचायत इमारती, चिकित्सालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोकळ्या जागा, स्मशानभूमी, समाज मंदिरे, शौचालय या मालमत्तांचे भांडवली मूल्य १३६ कोटी ७ लाख ५३ सहस्र रुपये आहे. त्यामुळे एवढे पैसे महापालिकेने द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेने केली आहे.