
परभणी – जिल्हाधिकारीच त्यांच्या खासगी सचिवांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करतात, असा आरोप खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना केला. त्यानंतर ‘कार्यकर्त्यांनी ठेकेदारी करू नये’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका येथे आढावा बैठक, तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा यात ते बोलत होते.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराच्या चर्चा गुप्त किंवा उघडपणे होत असतात, राजकीय नेत्यांनाही ते ठाऊक असते; परंतु त्याच्या मुळाशी जाऊन कारवाईची कार्यवाही मात्र होतांना दिसत नाही ! |