शिक्षकाला खंडणी मागणार्‍या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नांदेड – वसूर येथील शिक्षक धोंडिबा मुळे यांना माहिती अधिकार समितीच्या राज्य अध्यक्षा वैशाली गुंजरगे, प्रशांत मुळे आणि अन्य २ यांनी धमकी देऊन खंडणीची मागणी केली. मुळे यांना १० लाखांची खंडणी मागणार्‍या चौघांच्या विरोधात नांदेड येथील पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ३ अपत्य असल्याने तुमच्या विरोधात तक्रार करून नोकरी घालवू, अशी धमकी देऊन त्यांनी गुन्हा नोंद केला होता. त्या संदर्भात ५० सहस्र रुपयांची खंडणी घेतांना एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले. नांदेड येथील पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ राबवले आहे. त्यात अंतर्गत पोलीस ठाण्यात खंडणी मागणारे, चोर्‍या, घरफोडी करणारे, अवैध व्यवसाय करणारे यांच्या विरोधात कारवाई करत आहेत.