पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या संतसन्मान सोहळ्यात साधिकेने सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती

१.५.२०२५ या दिवशी पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित गुणवैशिष्ट्ये पाहू.

पू. (सौ.) ज्योती ढवळीकर

४. साधनेमुळे पू. (सौ.) ज्योतीताईमध्ये झालेले पालट

अ. आता ताईच्या वागण्या-बोलण्यात पुष्कळ पालट जाणवत आहे. मी धाकटी बहीण असल्यामुळे पूर्वी तिचे बोलणे थोडेसे अधिकारवाणीने व्हायचे; परंतु आता ती ‘माझे काही चुकले का ?’ किंवा ‘चूक झाली, तर क्षमा कर’, असे सांगते.

सौ. श्रुति सहकारी

आ. तिच्यातील चैतन्यामुळे सर्वांनाच तिचा सहवास हवा असतो.

इ. पती राजकारणात असल्यामुळे त्यांची आणि ‘मुलांची साधना कशी होईल ?’, याची काळजी वाटून तिला पूर्वी रडू यायचे; पण देवावरील श्रद्धेने हळूहळू तिने यावर मात केली. आता या सर्वांकडे ती साक्षीभावाने पहात असल्याचे लक्षात येते.

ई. ‘आपण ईश्वरावर श्रद्धा ठेवून कार्य करत रहायचे. बाकी सर्व ईश्वरेच्छा !’ असे ती सांगते आणि त्याप्रमाणे जगतेही.

५. ११ – १२ वर्षांपूर्वी ज्योतीताईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली. तेव्हा मी म्हणाले होते आणि आजही माझ्या मनात तोच विचार येत आहे, ‘एखाद्या समईतील ज्योत जशी शांतपणे तेवत राहून इतरांना प्रकाश देते, त्याचप्रमाणे पू. (सौ.) ज्योतीताई स्थिर आणि शांत राहून कार्य करत रहाते.’

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामुळे आम्हा सर्वांना अशा संतरत्नाचा कृपाप्रसाद मिळाला. त्यामुळे त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(समाप्त)

– सौ. श्रुति सहकारी (वय ५९ वर्षे) (पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची लहान बहीण), फोंडा, गोवा. (५.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक