मुंबईत माध्यमे, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५’ अर्थात् ‘वेव्हज् २०२५’

मुंबई – माध्यमे, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आतंरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन  ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५’ अर्थात् ‘वेव्हज् २०२५’ हे १ ते ४ मे २०२५ या कालावधीत मुंबईत भरणार आहे.मुंबईतील ‘जिओ कन्वेन्शन सेंटर’ येथे १५ सहस्र चौरस मीटरच्या परिसरात या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण विचारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या १०० हून अधिक नामांकित दिग्गज आस्थापनांना एकत्र व्यासपीठ मिळणार आहे.या शिखर परिषदेचा केंद्रबिंदू म्हणजे ‘भारत मंडप’ असेल, येथे ‘कलेपासून कोडपर्यंत’ या संकल्पनेखाली भारत सांस्कृतिक आणि तांत्रिक वारशाचे प्रतिनिधित्व करेल. यात श्रुती, कृती, दृष्टी आणि क्रिएटर लीप या चार अनुभवात्मक विभागांमधून भारतीय कथाकथनाची परंपरा आणि आधुनिक तांत्रिक प्रगती सादर केली जाईल.यात विविध राज्यांतील कलाकारही कला सादर करतील.