RSS Leader Urges Hindus : हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ स्वतःजवळ ६ इंचाचा चाकू बाळगावा !

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते के. प्रभाकर भट यांचे आवाहन

  • ६ इंचाचा चाकू बाळगण्यासाठी अनुमती लागत नसल्याचा दावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते के. प्रभाकर भट

मंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते के. प्रभाकर भट यांनी पहलगाम येथील आक्रमणावरून हिंदूंना स्वसंरक्षणासाठी चाकू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील मंजेश्वर येथील वरकाडी येथे एका कार्यक्रमात भट्ट बोलत होते. त्यांनी महिलांनाही त्यांच्या बॅगमध्ये चाकू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

भट पुढे म्हणाले की, ६ इंचाचा चाकू बाळगण्यासाठी कोणत्याही अनुमतीची आवश्यकता नाही. जर कुणी संध्याकाळनंतर बाहेर गेले, तर आक्रमण होण्याची शक्यता असते. त्याने आक्रमण करणार्‍यांना विनंती करण्याऐवजी त्यांना चाकू दाखवावा, म्हणजे ते घाबरतील आणि पळून जातील.