Nainital Minor Girl Rape : नैनिताल (उत्तराखंड) येथे वृद्ध मुसलमानाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार

  • संतप्त जमावाकडून मुसलमानांची दुकाने आणि वाहने यांची तोडफोड

  • मशिदीवर दगडफेक

  • मुसलमानांना चोपले

नैनिताल (उत्तराखंड) – येथील मल्लीताल परिसरात उस्मान नावाच्या ६५ वर्षीय  मुसलमानाने १२ वर्षांच्या हिंदु मुलीवर ३० एप्रिलच्या रात्री बलात्कार केल्यानंतर येथे हिंसाचार झाला. जमावाने मुसलमानांची दुकाने आणि वाहने यांची तोडफोड केली. एका मशिदीबाहेर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ची घोषणाबाजी करत दगडफेक करण्यात आली. काही मुसलमानांना पकडून मारहाणही करण्यात आली. बराच वेळ हा हिंसाचार चालू होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी उस्मान याला अटक केली. जमावाने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आरोपी उस्मान याला त्यांच्या स्वाधीन करण्याची मागणी केली. यामुळे पोलिसांना लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

संपादकीय भूमिका

अशा आरोपींना तात्काळ आणि कठोर शिक्षा मिळत नसल्याने जनतेकडून उद्रेक होत असेल, तर त्याला कोण उत्तरदायी ?