पुणे येथे हॉर्न वाजवण्याच्या वादातून हिंदु कुटुंबावर आक्रमण करणार्‍या धर्मांध रिक्शाचालकाला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – भवानी पेठ परिसरात हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर एका हिंदु कुटुंबाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली शोएब उमर सय्यद या रिक्शाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. २७ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता गुरुनानकनगर येथे ही घटना घडली. आरोपी काशीवाडी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून जाणार्‍या करण मेहता यांना माल उतरवतांना रस्त्यावर अडवणार्‍या सय्यदच्या रिक्शाचा सामना करावा लागला, तेव्हा हा वाद चालू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे करण मेहता यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

मेहता यांनी हॉर्न वाजवताच दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लगेचच सय्यद आणि त्याच्या अन्य ५ साथीदारांनी मेहता अन् त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आक्रमण केले, ज्यामध्ये त्यांचा भाऊ हर्ष मेहता, बहीण निकिता आणि त्यांचे काका यांचा समावेश होता. त्यांच्या घरावर दगडफेक आणि इतर वस्तू फेकण्यास चालू केले, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. पुढील अन्वेषण चालू असून ‘सीसीटीव्ही फुटेज’ आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका :

  • हिंदूंवर हात उचलण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही, असा वचक पोलिसांनी निर्माण करणे आवश्यक !
  • या घटनेवरून किरकोळ कारणावरून आक्रमक होणार्‍या धर्मांधांची क्रूर मानसिकता दिसून येते. धर्मांधांची ही घातक वृत्ती दिवसेंदिवस वाढत असून याची कित्येक उदाहरणे समोर येत आहेत.