आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१.५.२०२५)

देवेन भारती नवीन पोलीस आयुक्त

मुंबई – देवेन भारती मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून यांची नेमणूक झाली आहे. ३२ वर्षे सेवा दिल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर निवृत्त झाले आहेत. पोलीस दलाने त्यांना निरोप दिला. देवेन भारती यापूर्वी राज्यातील पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) आणि महाराष्ट्र आतंकवादी पथकाचे प्रमुखही होते.


बुडणार्‍या १६ जणांना वाचवले !

रत्नागिरी – पूर्णगड येथील समुद्रात बुडणार्‍या १६ तरुणांना जवळच असलेल्या बोटीतील लोकांनी वाचवले. त्यांच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने बोट पाण्यात बुडत होती.


शेवटची लोकल आता बदलापूरपर्यंतच !

मुंबई – छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून सुटणारी शेवटची लोकलगाडी ही आता कर्जतपर्यंत न धावता बदलापूरपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे कार्यालयातून विलंबाने घरी येणार्‍या कर्मचार्‍यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.


डबेवाल्यांचा बेस्ट दरवाढीला विरोध !

मुंबई – मुंबई धावती ठेवणार्‍या बेस्टच्या तिकिटांत वाढ करण्याचे संकेत मिळत असतांनाच मुंबईच्या डबेवाल्यांनी या दरवाढीला विरोध केला आहे. त्यांनी बेस्टचा ढिसाळ कारभार सुधारण्याचा सल्लाही दिला आहे.


गोदावरीत तरुण बुडला

नाशिक – गोदावरी नदीवरील रामकुंडावरून बीडच्या एका तरुणाचा पाय घसरून तो नदीपात्रात वाहून गेला. या वेळी नदीत पाण्याचा विसर्ग चालू होता.


सोन्याचा दर १ लाख १११ रुपयांवर !

मुंबई – अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर सोने खरेदी केले जात असूनही सोन्याचे दर वाढले असून आता २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर १ लाख १११ रुपये झाले आहेत.


धर्मांधांकडून हॉटेल चालकाचा खून !

परभणी – गंगाखेड येथे चहा-सिगारेट उधारीवर न दिल्याने आवेज खान गफ्फार खान, जुनेद खान जरावर खान यांनी हॉटेलचालकाला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या दोघांसह मंचक भालेराव यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आली आहे.

वरील २ धर्मांध हॉटेलवाल्याकडून चहा सिगारेट घेऊन पैसे देत नसत. त्यामुळे हॉटेल चालकाने वस्तू देण्यास नकार दिल्याने धर्मांधांनी त्याला बेदम मारले.