सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस दलातील ८ जणांचा उत्कृष्ट सेवेसाठी होणार गौरव

ओरोस – महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांचे सन्माचिन्ह अन् प्रशस्तीपत्रक घोषित करण्यात आले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण ८ जणांचा समावेश आहे.

१ मे या महाराष्ट्रदिनाच्या दिवशी होणार्‍या ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन हा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक रावले यांच्यासह साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद भिकाजी सावंत, दासू मुन्नू पवार, शिवाजी सुरबा सावंत, राजेंद्र गोविंद जामसंडेकर, लीलाधर गणपत राऊळ, तसेच पोलीस हवालदार सदानंद पांडू राणे आणि आरती अरविंद परब यांचा समावेश आहे.