
कोल्हापूर – पाकिस्तानी आतंकवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने कोल्हापूर शहरात सार्वजनिक शौचालयात पाकिस्तानचे झेंडे लावून निषेध करण्यात आला. या प्रसंगी कोल्हापुरात वास्तव्यास असणार्या पाकिस्तानी नागरिकांना त्वरित त्यांच्या देशात पाठवावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, सर्वश्री सुनील पाटील, अनिल चोरगे, संदीप सासणे, पांडुरंग पाटील, रणजित आयरेकर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.