महामहोपाध्याय श्री. देवदत्त पाटील यांच्या नेतृत्वाखालील वेदशास्त्र विद्या पाठशाळा

सांगे – अक्षय्य तृतीयेच्या शुभप्रसंगी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत सांगे येथील ‘ऋषिवन’ आताचे रिवण या प्राचीन, ऐतिहासिक भूमीत महामहोपाध्याय श्री. देवदत्त पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्रीविद्या पाठशाळेची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. ‘ऋषिवन’ या पवित्र प्रदेशात श्रीविद्या पाठशाळा शास्त्रअध्ययन कार्यक्रम राबवत आहे. या ठिकाणी मुलीदेखील शास्त्र विद्येचे शिक्षण घेतात.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मला विश्वास आहे की, नवीन इमारतीसह श्रीविद्या पाठशाळा पवित्र गुरुकुल म्हणून उदयास येईल आणि या प्रदेशात ‘ऋषिवन’चा वारसा पुनरुज्जीवित करेल आणि तरुणांना शास्त्रविद्येने समृद्ध करेल.