पुणे – केलेल्या कामाचे देयक संमत करण्यासाठी ६० सहस्र रुपयांची लाच मागितली. ती रक्कम स्वीकारतांना भांबर्डे (ता. शिरूर) ग्रामपंचायत अधिकारी निर्मला कैलास भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाच देणे मान्य नसल्याने ३७ वर्षीय व्यक्तीने तक्रार प्रविष्ट केली होती.
भुजबळ यांच्यावर रांजणगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. ही कारवाई २८ एप्रिल या दिवशी करण्यात आली. तक्रारदाराने वर्ष २०२०-२१ मध्ये भांबर्डे येथे पेव्हर ब्लॉक बसवले होते. त्याचे देयक संमत करण्यासाठी देयक रकमेच्या ६ टक्के किंवा ६० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
संपादकीय भूमिकामहिला भ्रष्टाचारात पुढे असणे दुर्दैवी ! तळागाळातही भ्रष्टाचार चालू असल्याची प्रकरणे दर काही दिवसांनी सापडणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |