महापालिकेची कारवाई !

पुणे – पुणे महापालिकेने धायरी गावातून डी.एस्.के. विश्वकडे जाणार्या रस्त्याचे ४ दिवसांपूर्वी डांबरीकरण केले होते. २८ एप्रिल या दिवशी कोणतीही पूर्वअनुमती न घेता मलवाहिनी टाकणार्या ठेकेदाराने जेसीबीच्या (रस्ता खणण्याचे यंत्र) साहाय्याने रस्ता खणला. रस्ता खणल्याची तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या पथ विभागाने जागेवर जाऊन पहाणी केली असता कोणतीही पूर्वअनुमती न घेता ठेकेदाराने रस्ता खोदल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ठेकेदाराला दंडाच्या रकमेच्या तिप्पट रकमेचा २ लाख १९ सहस्र ४६५ रुपयांचा दंड ठोठावला, अशी माहिती पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.