सनातनच्या १३२ व्या समष्टी संत पू. (सौ.) ज्योती ढवळीकर (वय ६३ वर्षे) यांचे संतपद २४.२.२०२५ या दिवशी घोषित झाले. गुरुकृपा आणि त्यांची साधना यांमुळे त्यांनी संतपद प्राप्त केले. या लेखामध्ये आपण त्यांना संतपदापर्यंत नेणार्या त्यांच्या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत.

१. पू. (सौ.) ज्योती ढवळीकर श्री महालक्ष्मीच्या हातातील कमळाचा अंश-अवतार असणे
पू. (सौ.) ज्योती ढवळीकर या साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीच्या हातातील कमळाचा अंश-अवतार आहेत. त्यामुळे त्यांची कांती कोमल असून त्यावर कमळाप्रमाणे गुलाबी छटा आणि मुखावर कमळाप्रमाणे दिव्यता अन् प्रसन्नता सदैव दिसते. त्यांच्यामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे ३ टक्के तारक तत्त्व आणि ७ टक्के मारक तत्त्व, असे एकूण १० टक्के तत्त्व कार्यरत आहे. सत्ययुगात ‘राणी ज्योतिर्प्रभा’, त्रेतायुगात ‘राणी ज्योतिष्मती’, द्वापरयुगात ‘राणी ज्योत्स्ना’ आणि कलियुगात ‘सौ. ज्योती ढवळीकर’ या नावांनी त्यांचे पृथ्वीवर जन्म झालेले आहेत. या जन्मातही त्यांचा स्थुलातील निवास गोवा राज्यातील बांदिवडे येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या सुरेख अशा मंदिराच्या आवारात आहे. त्या श्री महालक्ष्मीचा अंश-अवतार असल्यामुळे पृथ्वीवरील त्यांच्या प्रत्येक जन्मामध्ये त्यांना ‘धन, ऐश्वर्य, वैभव, समृद्धी आणि सुबत्ता’ यांचा लाभ झाला आहे.
२. पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या विविध जन्मांचे आध्यात्मिक महत्त्व !

टीप १ – व्यष्टी स्तरावरील प्रारब्धाचे भोग भोगण्याच्या तुलनेत समष्टी स्तरावरील प्रारब्धभोग भोगण्यासाठी साधनेचा व्यय अधिक प्रमाणात होतो; परंतु व्यष्टी स्तरावरील प्रारब्धभोग भोगण्याच्या तुलनेत समष्टी स्तरावरील प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी गुरुकृपाही अधिक प्रमाणात होते.
टीप २ – पू. (सौ.) ज्योतीताईंची या जन्मात गुरुकृपायोगानुसार साधना चालू असल्यामुळे प.पू. गुरुदेवांनी त्यांच्याकडून या जन्मात सर्वाधिक प्रमाणात समष्टी साधना करवून घेतली. त्यामुळे अन्य जन्मांच्या तुलनेत या जन्मात त्यांची आध्यात्मिक उन्नती सर्वाधिक प्रमाणात होऊन त्यांनी समष्टी संतपद प्राप्त केले आहे.
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखन करण्याचा दिनांक अन् वेळ : २८.३.२०२५, दुपारी २.३५ ते ३.१७)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |