ठाणे, ३० एप्रिल (वार्ता.) – २ वेगवेगळ्या प्रकरणांत तलाठी आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या विरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. कळवा येथील ७/१२ उतारा गृहसंकुलाच्या नावावर करण्यासाठी तलाठी सिद्धी पातकर यांनी तक्रारदारकडून ४० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाणे येथे गुन्ह नोंद करण्यात आला आहे. तर दुसर्या प्रकरणात भिवंडी येथे पंचायत समितीच्या कामाचे देयक बनवण्यासाठी शाखा अभियंता प्रमोद जुमळे याने ठेकेदाराकडून २ लाख २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकालाचखोर प्रशासन ! |