Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला आशीर्वाद मिळण्यासाठी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कार्यक्रम स्थळाची प्रतिकृती

भाग्यनगर : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर, म्हणजेच ३० एप्रिल या दिवशी  सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी तिरुपती येथील श्री बालाजीचे दर्शन घेतले.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची निमंत्रणपत्रिका तिरुपती बालाजीच्या चरणी अर्पण करण्यासाठी जातांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

या वेळी त्यांनी गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची निमंत्रणपत्रिका तिरुपती बालाजीच्या चरणी अर्पण केली आणि आशीर्वाद घेतले.

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्री बालाजीच्या चरणी ‘हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत’, अशी प्रार्थना केली.