मध्यप्रदेशात हिंदु युवतींवर बलात्कार करून त्यांचे धर्मांतर करणार्‍या मुसलमान नराधमांच्या टोळीची कुकृत्ये उघड !

  • मुसलमान नराधमांनी घडवून आणलेले वासनाकांड उघड

  • वर्ष १९९२ मध्ये अजमेर येथे झालेल्या वासनाकांडाशी साम्य

भोपाळ (मध्यप्रदेश) – शहरातील प्रसिद्ध टीआईटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार करणे, त्याच्या अश्लील ध्वनीचित्रफिती बनवणे आणि नंतर धमकावून त्यांच्यावर वारंवार बलात्कार करणार्‍या मुसलमान नराधमांच्या टोळीच्या कारवाया उघड झाल्या आहेत. या नराधमांनी अनेक हिंदु विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले, तसेच धमकावून त्यांना  धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले आहे. या प्रकरणी फरहान, साहिल आणि अबरार यांना  पोलिसांनी अटक केली आहे. फरहान हा या टोळीचा म्होरक्या आहे. या वासनाकांडामध्ये अनेक निष्पाप हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून त्यांतील काहींनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वर्ष १९९२ मध्ये राजस्थानमधील अजमेर येथे शाळेतील हिंदु विद्यार्थिनींचे मुसलमानांनी लैंगिक शोषण केले होते. भोपाळ येथील वासनाकांड आणि अजमेर प्रकरण यांत साम्य असल्याचे बोलले जात आहे.

२ बहिणींच्या तक्रारीनंतर वासनाकांड उघड

फरहान खान याने महाविद्यालयातील अनेक हिंदु विद्यार्थिनींना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी बी.टेकचे शिक्षण घेणार्‍या २ बहिणींनी फरहान खान याच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर फरहान याच्या घृणास्पद कारवाया उघड झाल्या. यांतील मोठ्या बहिणीवर वर्ष २०२२ मध्ये जहांगिराबाद येथे बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्यावरील अत्याचारांविषयी धमकावून तिच्या लहान बहिणीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर दोघांवर लग्न करून धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. कालांतराने लहान बहिणीची ओळख आदिल खान याच्याशी करून देण्यात आली. आदिल खान यानेही तिच्यावर बलात्कार केला.

वारंवार बलात्कार करणार्‍या मुसलमान नराधमांची टोळी

‘डान्स क्लास’च्या नावाखाली हिंदु युवतींचे शोषण

१. साहिल खान याने महाविद्यालयात पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षणाकडे पाठ फिरवली. अभ्यास सोडून अशोका गार्डन परिसरात त्याने ‘डान्स क्लास’ चालू केला. तेथे केवळ हिंदु मुलींना प्रवेश दिला जात होता.

२. नृत्य शिक्षक असल्याचे सांगून साहिल याने मुलींशी जवळीक साधली. बाहेर गावातून शिक्षणासाठी आलेल्या गरीब हिंदु युवतींना स्वप्ने दाखवून तो पबमध्ये घेऊन जायचा. जेव्हा मुलींना त्याच्यावर विश्वास बसायचा, तेव्हा तो त्यांना पार्टीच्या नावाखाली अशोका गार्डनमधील त्याच्या खोलीत घेऊन जायचा.

३. या खोलीतच त्याने प्रथम बैतुल येथील एका युवतीवर कोल्ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळून बलात्कार केला. या वेळी त्याने या युवतीचे अश्लील व्हिडीओही बनवले. त्यानंतर हेच व्हिडीओ दाखूव तिला ब्लॅकमेल करून लागला आणि तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

४. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्याच्या नावाखाली त्याने त्याचा मित्र फरहानला त्याच्या खोलीत बोलावून युवतीवर बलात्कार करण्यास भाग पाडले.

५. या घृणास्पद कृत्यामध्ये साहिलसमवेत फरहान खान, अली खान, शाजी उपाख्य शमसुद्दीन, अबरार आणि नबील हेही सहभागी होते.

६ विद्यार्थिनींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे नोंद !

आतापर्यंत भोपाळच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये ६  विद्यार्थिनींवर बलात्कार झाल्याचे समोर आले असून त्या प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहे. फरहान याला अटक करून त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. साहिल यालाही चौकशीसाठी पन्ना येथून भोपाळ येथे आणण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ सरकार असून तेथे लव्ह जिहादविरोधी कठोर कायदे आहेत. असे असतांनाही जिहादी मुसलमान हिंदु युवतींवर बलात्कार करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास धजावतात. यावरून त्यांना वठणीवर आणण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, हे लक्षात येते !