Love Jihad : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला प्रशासकीय अधिकारी मुसलमान अधिकार्‍यासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये !

महिलेच्या पालकांचा ‘लव्ह जिहाद’चा आरोप

(‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे विवाह न करता एकत्र रहाणे)

सौजन्य नवभारतटाइम्स.कॉम

जयपूर (राजस्थान) – येथे एका हिंदु महिला प्रशासकीय अधिकार्‍याच्या पालकांनी त्यांच्या मुलीला लव्ह जिहाद अंतर्गत फसवण्यात आल्याचा आरोप केला आहे. ही महिला प्रशासकीय अधिकारी तिच्या एका मुसलमान प्रशासकीय अधिकार्‍यासमवेत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहात आहे. जेव्हा महिला अधिकार्‍याच्या पालकांना हे कळले, तेव्हा त्यांनी पोलिसांत जाऊन याविषयी माहिती दिली, तसेच मुलीला परत घरी येण्याची विनंती केली; परंतु तिने घरी येण्यास नकार दिला. या महिला अधिकार्‍याच्या पालकांचे म्हणणे आहे की, तिला फूस लावून यात अडकवण्यात आले असून हा लव्ह जिहाद आहे. तथापि महिला अधिकार्‍याने पोलिसांना सांगितले की, ती स्वतःच्या इच्छेने ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहात आहे.
या महिला अधिकार्‍याचे पालकदेखील निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत.

२८ एप्रिल या दिवशी या महिलेच्या वडिलांनी बजाज नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली  की, त्यांच्या मुलीला अमन खिलदार या मुसलमान अधिकार्‍याने आमिष दाखवले आहे आणि तिला तिचा धर्म आणि संस्कृती यांच्यापासून दूर नेण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंनी त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासह धर्मशिक्षण देऊन धर्माभिमानी आणि धर्माचरणी बनवले, तर ते अशा प्रकारच्या फसवणुकीला कधीच बळी पडणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !