Pakistani Arrested In Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये २ पाकिस्तानी नागरिकांना अटक !

बनावट आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र जप्त

अटक करण्यात आलेले पाकिस्तानी नागरिक

रायपूर (छत्तीसगड) – रायगड जिल्ह्यात २ पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून भारतीय आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. पाकिस्तानी नागरिकांनी खोटी माहिती देऊन ते बनवले होते. या दोघांकडे दीर्घकालीन व्हिसाही सापडला आहे. अटक केलेल्या पाकिस्तानी नागरिकांची नावे इफ्तिखार आणि अरनिश अशी आहेत. हे दोघेही आरोपी रायगड जिल्ह्यातील कोडातराई गावात याकूब शेखच्या घरात रहात होते. या आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बी.एन्.एस्.) १९९, २००, ४१९, ४६७ आणि ४६८ या कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश मरकाम यांनी दिली

संपादकीय भूमिका

भारताची ओळखपत्रे मिळवून देणारे आणि त्यांची येथे रहाण्याची सोय करणारे यांच्यावरही कठोर कारवाई करण्यासाठी अन्वेषण यंत्रणांनी प्रयत्न केले पाहिजे !