SC Refuses To Quash FIRs : आतंकवादी महंमद अफझल याचे कौतुक करणार्‍या २ मुसलमानांवरील गुन्हा रहित करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार

आतंकवादी महंमद अफझल

नवी देहली – संसदेवरील आक्रमणातील दोषी महंमद अफझल याचे कौतुक करणे, उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कपड्यांवर टिपणी करणे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या न्यायाधिशांविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरणे या आरोपाखाली तमिळनाडूतील ‘तौहीद जमात’ संघटनेच्या रहमतुल्ला आणि जमाल महंमद या २ सदस्यांविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. १७ मार्च २०२२ या दिवशी मदुराई येथे झालेल्या निषेध सभेत रहमतुल्ला आणि जमाल महंमद यांनी अत्यंत आक्षेपार्ह द्वेषपूर्ण भाषणे दिली होती, असेही त्यात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

अशांवर तर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !