२०० वर्षे जुन्या स्मशानभूमीला गुरे बाजारात रूपांतरित करण्यात येणार

ढाका (बांगलादेश) – येथे प्राण्यांचा बाजार चालू करण्यासाठी बांधकाम चालू असलेले हिंदूंचे एक मंदिर, तसेच २०० वर्षे जुनी स्मशानभूमी पाडण्यात आली. ही घटना मैमनसिंग जिल्ह्यातील उच्छाखिला युनियनमध्ये घडली.
DEPLORABLE! Hindu Mandir DEMOLISHED & 200-yr-old cemetery to be a cattle market in Bangladesh! 🇧🇩 😡
Angry Hindus protest as hundreds of attacks hit them post-Sheikh Hasina.
Arrests, @iskcon ban attempts & 'sedition' charges on Chinmoy Krishna Das Prabhu reveal alleged… pic.twitter.com/ueF44W3qv4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 30, 2025
१. हिंदूंचा आरोप आहे की, ईश्वरगंज उपजिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी महंमद एरशादुल अहमद यांनी हिंदूंचे मंदिर आणि स्मशानभूमी बळजोरीने पाडली. स्मशानभूमी दुसर्या ठिकाणी हालवण्याची घोषणाही केली.
२. हिंदूंचे नेते पिंटू चौधरी म्हणाले की, ही स्मशानभूमी आणि मंदिर आमच्या श्रद्धेची प्रतीके आहेत आणि ती कोणत्याही किमतीत हालवता येणार नाहीत. सनातन धर्माचे अनुयायी या घटनेमुळे अत्यंत संतप्त आहेत आणि म्हणूनच ते रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत.
३. आणखी एक स्थानिक हिंदु नेते परेश साहा म्हणाले की, एक इस्लामी गट हिंदूंना परिसरातून हाकलून लावण्याची धमकी देत आहे; परंतु सरकार त्याविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही.
४. बांगलादेश पूजा उजापन मोर्चाचे सचिव बिजॉय मित्रा शुभो म्हणाले की, हिंदूंनी आधीच विध्वंस थांबवण्यासाठी माहिती दिली होती; परंतु तरीही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.
५. तथापि अधिकारी महंमद एरशादुल अहमद यांनी ‘ही घटना अनावधानाने घडली’, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तानसह बांगलादेशालाही धडा शिकवण्याचे धाडस भारत कधी करणार ? |