असीम मुलाणी याला अटक !
शेलपिंपळगाव (पुणे) – मोहितेवाडी (ता. खेड) येथील १६ वर्षीय मुलीवर २६ वर्षीय असीम मुलाणी याने बळजोरीने बलात्कार केला. या प्रकरणी रहिवाशांनी निषेध सभा घेत गावबंदी पाळली. ‘लव्ह जिहाद’च्या अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला कडक शिक्षा करावी, अशी मागणी गावकर्यांनी केली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवून शिक्षा केली असती, तर नागरिकांना निषेध सभा घेऊन आरोपींवर कारवाईच्या मागणीची वेळच आली नसती ! – संपादक)
मुलाणी याने मुलीवर १६ डिसेंबर २०२४ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये बलात्कार केला. कुणाला सांगितल्यास जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. अत्याचाराला कंटाळून मुलीने घरी सांगितले. गावातील तरुणांनी निषेध सभा आयोजित केली. ग्रामदैवत हनुमान मंदिराजवळील मांसाहार विक्रीचे दुकान बंद करावे, जामा मशीदजवळील अतिक्रमण काढावे, नमाजपठणासाठी बाहेरहून येणार्यांवर बंदी घालावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ म्हणाले की, विंचवाची नांगी आम्ही ठेचून काढू. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. (पोलिसांनी ही घटना ‘लव्ह जिहाद’ म्हणून नोंद केली आहे का ? त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे का ? – संपादक)