मिरज येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मोर्चा काढून पाकच्या ध्वजाची होळी !

पाकच्या ध्वजाची होळी करतांना कार्यकर्ते

मिरज (जिल्हा सांगली), २९ एप्रिल (वार्ता.) – पहलगाम येथे आतंकवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ मिरज येथे २५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील श्री मैदान दत्त मंदिर चौक ते महाराणा प्रताप चौक येथे मोर्चा काढण्यात आला.

त्यानंतर आक्रमणाचा जाहीर निषेध करून पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन  हिंदुत्वनिष्ठांनी पाकिस्तानच्या ध्वजाला जोडे मारून ध्वजाची होळी केली.