माहीम – येथील विविध संघटनांच्या वतीने पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यात आला. माहिम मच्छीमारनगर येथील श्रीराम मंदिर ते टॅक्सी स्टँड अशी पदयात्रा काढत नागरिकांना आवाहन करण्यात आले. या वेळी माहिम मच्छीमार वसाहत, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, भाजपा, मनसे, शिवसेना, तसेच स्थानिक मंडळाचे एकूण २०० कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. निष्पाप नागरिकांच्या हत्या करणार्या पाकपुरस्कृत आतंकवादाला संपवण्यासाठी सरकारने आता कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.