भाजपने आंदोलन केल्यामुळे केली कृती

बेळगाव – येथे एका कार्यक्रमाच्या वेळी कर्नाटकाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका पोलीस अधिकार्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. सिद्धरामय्या व्यासपिठावर असतांना तेथे उपस्थित लोकांसमोर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. काँग्रेसने केंद्र सरकारची जनविरोधी धोरणे आणि देशविरोधी कारभार यांच्याविरुद्ध निषेधाचे आयोजन केले होते. त्या काळात ही घटना घडली. यावर भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भाषण भाजपच्या कार्यकर्त्यांनी कथितपणे थांबवण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त झालेलेमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस अधिकार्याला व्यासपिठावर बोलावले. सिद्धरामय्या यांनी त्याला विचारले, ‘तू काय करत आहेस ?’ त्यानंतर त्यांनी त्याच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला; पण मारहाण केली नाही. या वेळी तेथे उपस्थित काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला आणि कायदा अन् संसदीय कामकाज मंत्री एच्.के. पाटील यांनी सिद्धरामय्या यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.